मॅक्सवेलची अष्टपैलू चमक

8

सामना ऑनलाईन, मुंबई

वन डे मालिकेत इंग्लंडकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्वेण्टी-२० मालिकेत झोकात पुनरागमन करताना सलग दुसऱया विजयाला गवसणी घातली. ग्लेन मॅक्सवेलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कांगारूंनी बुधवारी इंग्लंडला पाच गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारली. अवघ्या  ५८ चेंडूंत नाबाद १०३ धावांची खेळी साकारणाऱया ग्लेन मॅक्सवेलची यावेळी सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना अपयश येत असतानाच ग्लेन मॅक्सवेलने  ‘वन मॅन शो’चा खेळ केला. त्याने चार खणखणीत षटकार व दहा नेत्रदीपक चौकार चोपून काढले. त्याआधी इंग्लंडने ९ बाद १ ५ ५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने १० धावा देत ३ फलंदाजांना तंबूत पाठवत गोलंदाजीतही निर्णायक भूमिका बजावली.

आपली प्रतिक्रिया द्या