ताडोबा सफारीत झालं ‘माया’च्या बछड्यांचं दर्शन

69

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माया वाघिणीने पुन्हा एकदा दोन बछड्यांना जन्म दिला आहे. शनिवारी काही पर्यटक जंगल सफारी करत असताना ताडोबा तलाव आणि पांढरपवनी भागात त्यांना या वाघीण आणि तिच्या बछड्यांचे दर्शन झाले. निखिल अभ्यंकर या छायाचित्रकाराने ‘माया’ची काही चित्रे टिपली आहेत.

maya2 maya1

maya3

ताडोबामधील मटकासूर हा वाघ तिचा जोडीदार आहे. माया वाघिणीने बछड्यांना जन्म देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी मायाने २ बछड्यांना जन्म दिला होता, मात्र काही जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यात हे बछडे दगावले होते. माया वाघिणीने आतापर्यंत दोन वेळा पाच पिल्लांना जन्म दिला आहे. पुन्हा तिसऱ्यांदा मायाने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. माया आणि तिचे बछडे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या माया वाघिणीचा फोटो डाक विभागाने पोस्टाच्या टपाल तिकिटावर २९ जुलै या व्याघ्र दिनी प्रकाशित केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या