मयांक वैद एंडुरोमन ट्रायथलॉनचा विजेता

520

हिंदुस्थानी ट्रायऍथलिट मयांक वैदने अतिशय कठीण मानली जाणारी एंडुरोमन ट्रायथलॉन स्पर्धा 50 तास 24 मिनिटांत जिंकत मोठा पराक्रम नोंदवला आहे.463.5 किमी अंतराची ही स्पर्धा लंडन येथे सुरू झाली आणि पॅरिसमध्ये संपली. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा पहिला आशियाई ऍथलिट म्हणून आपल्या नावाची नोंद केली आहे. यापूर्वी बेल्जियमच्या जुनियर डेलेनरन 52 तास आणि 30 मिनिटे या वेळेत ही स्पर्धा जिंकली होती. मयांक ही स्पर्धा जिंकणारा जगातला 44 वा ऍथलिट ठरला. मयांकने यंदा स्पर्धा पूर्ण करायला 2 तास 6 मिनिटे कमी घेत नव्या विश्वविक्रमी वेळेची नोंद केली.

इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांतून पार पडणारी ही एंडुरोमन ट्रायथलॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन गणली जाते. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारे बहुतांशी ऍथलिट हे माऊंट एव्हरेस्ट सर केलेले गिर्यारोहक आहेत. त्यावरून ही स्पर्धा किती अवघड असेल याची प्रचीती येते, असे मत यंदाचा विजेता मयांक याने व्यक्त केले आहे.

मयांकने धावण्याची रेस 16 तास 35 मिनिटांत पूर्ण केली

ट्रायथलॉन म्हणजे पोहणे, धावणे आणि सायकल दौड अशा तीन क्रीडा प्रकारांनी सजलेली स्पर्धा. मयांकने या स्पर्धेतील धावण्याची रेस 16 तास 35 मिनिटांत पूर्ण केली. त्याने पोहण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी घेतले 12 तास 48 मिनिटे, तर सायकलिंग स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 13 तास 29 मिनिटे घेतली. या तीन स्पर्धांमध्ये त्याने 5 तास 12 मिनिटे आणि 2 तास 20 मिनिटे असा वेळ घेतला. हा वेळ म्हणजे एक स्पर्धा पूर्ण करून दुसरी स्पर्धा सुरू करायला लागणारा वेळ.

आपली प्रतिक्रिया द्या