आरक्षण : सरसंघचालक-मायावती ‘चर्चा’ रंगली!

293
mohan-bhagwat

आरक्षण ही मानवतावादी संविधानिक व्यवस्था आहे. तिच्यात फेरबदल करणे अयोग्य आणि अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ‘आरएसएस’ने आरक्षणविरोधी मानसिकता सोडावी अशी टीका बसपा नेत्या मायावती यांनी केली  तर काँग्रेसने दलित आणि मागासांचे आरक्षण रद्द करण्याचा संघाचा अजेंडा असल्याचे म्हटले आहे.

‘आरएसएस’च्या लोकांनी अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासांच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावर उघडपणे आणि मन मोकळ्या वातावरणात चर्चा करावी असे मत व्यक्त करणे म्हणजे संशयास्पद आणि घातक आहे. खरे तर अशा चर्चेची काहीच आवश्यकता नाही. उलट यामुळे समाजात संशयाचे वातावरण निर्माण होईल, असे मायावती यांनी म्हटले आहे.

संघाचा दलितविरोधी चेहरा समोर आला

दलित-मागासांचे अधिकार हिराकून घेणे हाच संघ आणि भाजपचा खरा अजेंडा आहे. मोहन भागकत यांनी आरक्षणाबाबत जे मत व्यक्त केले त्यातून संघाचा दलितकिरोधी चेहरा समोर आला आहे. गरीबांच्या अधिकारांकर डल्ला मारणे, संकिधानांनी दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करत आरक्षण रद्द करण्याचा आणि संकिधान बदलण्याचा हा डाव असल्याची टीका काँग्रेस प्रकक्ते रणदीप सुरजेकाला यांनी केली आहे.

आरक्षणाच्या समर्थकांनी आरक्षणकिरोधकांच्या हिताकडे लक्ष देऊन बोलले पाहिजे, तर आरक्षणकिरोधकांनी आरक्षण समर्थकांच्या हिताची बाजू घेऊन बोलावे. या विषयावर प्रत्येक वेळी वादळी चर्चा होत असते. तसे न होता दोन्ही बाजूत सामंजस्याचे वातावरण निर्माण होण्याची गरज असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या