प्रियंका गांधी कोटातील मृत बालकांच्या मातांना का नाही भेटल्या, मायावतींची टीका

400

राजस्थानमधील कोटा शहरात 100 हून अधिक नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी सर्व उपाययोजना केल्यातील अशी ग्वाही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या मृत बालकांच्या मातांना का नाही भेटायला गेल्या असा सवाल बसप अध्यक्षा मायावती यांनी उपस्थित केला आहे. तसेच ही बाब अतिशय गंभीर असून एखाद्या आईचे मूल जाणे खूप दुखदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

मायावती म्हणाल्या की, “काँग्रेस शासित राज्यात राजस्थानमध्ये 100 हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या आईसाठी ही बाब अतिशय दु:खदायक आहे. यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रियंका गांधी यांनी या प्रकरणी बाळगलेले मौन हे दुःखदायक असे मायावती म्हणाल्या. “प्रियंका गांधी यांच्या पक्षामुळे अनेक मातांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश प्रमाणे त्यांनीही कोटा शहरात जाऊन त्या मातांची भेट घ्यायला हवी होती असे मायवाती म्हणाल्या. जर प्रियंका गांधी कोटात जाऊन पीडीत मातेंची भेट नाही घेतली, तर त्याचा अर्थ असा होईल की उत्तर प्रदेशमध्ये पीडितांची भेट घेणे ही फक्त त्यांची नाटकबाजी आणि त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असे सिद्ध होईल असेही मायावती म्हणाल्या.

राजस्थानच्या कोटा शहरातील जेके लोन इस्पितळाअत 9 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका महिन्यात 100 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने गेहलोत सरकार चौफेर टीका होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या