कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा शॉक नको, बसपाच्या मायावतींची सरकारकडे मागणी

गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन बसपाच्या नेत्या मायावती यांनी केंद्र सरकारला कचाटय़ात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच सामान्य नागरिक कोरोनाशी लढत आहेत, या संकटात इंधन दरवाढीचा शॉक नको, त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर इंधनाचे दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी त्यांनी  केली.

गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर चांगलेच वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे आता बसपाच्या मायावतींनी लवकरात लवकर केंद्र सरकारने इंधनाचे दर नियंत्रणात आणावेत असं म्हटलं आहे. तर काही दिवसांपासून सुरू असलेल्या चीनच्या मुद्दय़ावरदेखील त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले.

आपली प्रतिक्रिया द्या