खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत, पालिका ओळखपत्र देणार – महापौर किशोरी पेडणेकर

855

‘कोरोना’च्या भीतीने मुंबईतील अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे इतर आजार होणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवावेत असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केले. या खासगी डॉक्टरांना पालिका खास ओळखपत्र देईल असेही त्या म्हणाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावाही घेतला. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर फिरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या कामगारांच्या खाण्याची गैरसोय होत असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा उपस्थित होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या