अरे बापरे! महापौरांनी केले मगरीशी लग्न!!

32

सामना ऑनलाईन । मेक्सिको

हिंदुस्थानमध्ये पाऊस पडावा म्हणून बेडकाचे लग्न लावून देण्याचे प्रकार ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही होतात. अगदी तसेच मेक्सिकोमध्येही झाले. मेक्सिकोच्या महापौरांनी चक्क एका मगरीशी लग्न केले. या लग्नानिमित्त संपूर्ण मेक्सिको शहराला आमंत्रण होते. बँडबाजाच्या दणदणाटात वरपक्ष जेव्हा नववधूच्या घरी पोहचला तेव्हा पांढरा शुभ्र गाऊन व डोक्यावर फुलांचा मुकूट घातलेल्या नववधूने सरपटत सासरच्यांचे उत्सुफर्तपणे स्वागत केले. हे अनोखे दृश्य टिपण्यासाठी हजारो कॅमेरामन उपस्थित होते.

मेक्सिको ही मासळी बाजाराची मोठी व्यापारपेठ म्हणून ओळखली जाते. यामुळे समुद्री जीवांना येथे विशेष महत्व आहे. पाण्यात व पाण्याबाहेर राहणाऱ्या प्राण्यांचे संगोपन केले की इथल्या नदी व समुद्रात वर्षभर माशांची पैदास होते. तसेच मगर ही राजकुमारी आहे, असा येथील लोकांचा जुना समज आहे. यामुळे येथील प्रत्येक महापौराला मगरीशी लग्न करावे लागते. यामुळे सॅन पेड्रो हुआनेलुला या शहरातील लोकांचे कल्याण व्हावे, त्यांच्या मासळी व्यवसायाची भरभराट यावी यासाठी मेयर (महापौर) व्हिक्टर एगुइलर यांनी मगरीशी लग्न केले. यावेळी पाहुण्यांसाठी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या