मयुरी वाघ आणि पियुष रानडे विवाहबद्ध

सामना ऑनलाईन,मुंबई

झी मराठीवरील ‘अस्मिता’ या गाजलेल्या मालिकेतील डिटेक्टिव्ह अस्मिता म्हणजेच मयुरी वाघ ही तिच्या मालिकेतील नवऱयासोबत खऱया आयुष्यात लग्नाच्या बंधनात अडकली आहे.  बडोदा येथे मराठी सेलिब्रिटीजच्या उपस्थितीत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला.

मयुरी व पियुष रानडे हे या मालिकेच्या सेटवरच भेटले. मालिकेत सुरवातील प्रियकर प्रेयसी व नंतर नवरा बायकोचा अभिनय करताना  ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या दोघाचा साखरपुढा झाला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या