माजलगाव नगर परिषदेत 4 कोटी रुपयांच्या अपहार

453

माजलगाव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि सध्या श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी. सी. गावित  यांच्यासह तीन जणांवर  एक कोटी 44 लाख  29 हजार 959 रुपयांचा अपहार केल्याप़करणी माजलगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालगाव शहरात विविध विकास निधी प़ाप्त झाला होता. गावित यांच्यासह लेखापाल अशोक भिमराज कुलकणीं, स्थापत्य अभियंता सल्लागार  महेश कुलकणीं  यांनी संगनमत करुन काँक़ीट रोड नाल्याच्या बावीस शासकिय कामांची बनावट कागदपत्र तयार केली. ही कागदपत्र बनावट आहे, हे माहित असतांना अधिकाराचा गैरवापर करुन सरकारची एक कोटी 44 लाख 29 हजार 959 रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली. या प़करणी माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुलेमान  सय्यद करत आहे.

देवळाली प़वरा नगर परिषद चे तत्कालिन मुख्याधिकारी नानाभाऊ महानवार यांना तक़ारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.लाच प़करणी गावीत यांचा संबंध आहे.  राहाता नगर परिषद मध्ये गावीत मुख्याधिकारी असतांना  स्वच्छतेचा ठेका देण्यात आला होता. गावीत हे ठेकेदाराला त्रास देत होते. लाच प़करणी गावीत यांचा समावेश असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.

गवीत नाँट रिचेबल

अपहार प़करणा संदर्भात गावीत यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे. पालिकेत विचरणा केली असता साहेब कुठे आहे हे सांगता येत नाही , असे सांगितले. गावीत हे कुणाचेही फोन उचलत नाही, अशा तक़ारी लोकप्रतिनिधींसह अनेकांनी केल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या