मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या मॅक स्पायसी फ्राइड चिकनला ग्राहकांची पसंती

mac-spicy-chicken

देशात बर्गरची ओळख निर्माण करून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केल्यानंतर मॅकडोनाल्ड्स इंडिया फ्राइड चिकन सारख्या पदार्थांमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहे. दक्षिण हिंदुस्थानातील ग्राहकांना चवदार चिकन देण्यासाठी या ब्रँडने मॅक स्पाइस फ्राइड चिकन हे फ्राइड चिकन बाजारात आणले आहे. मॅक स्पायसी फ्राइड चिकन हे उत्तम दर्जाच्या चिकनपासून तयार केले जाते आणि संपूर्ण बाजारपेठेतील एकमेव असे चिकन आहे, जे हाडाच्या खालीही मसालेदार आहे. दक्षिण हिंदुस्थानातील बाजारपेठेत हा पदार्थ विशेष करून उपलब्ध आहे. कंपनीच्या चिकन नगेट्स, स्ट्रिप्स आणि चिकन बर्गरच्या श्रेणीमध्ये ही आणखी एक लज्जतदार भर कंपनीने घातली आहे.

नवे मॅक स्पायसी फ्राइड चिकन हा आरोग्य आणि चव यांचा सर्वोत्तम मिलाफ आहे. चमचमीत आणि रसदार अशा या पदार्थामध्ये प्रथिनांचे भरपूर प्रमाण आहे आणि त्यात अनैसर्गिक फ्लेवर्स, रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्हजही वापरलेले नाहीत. तसेच झणझणीत अशा घोस्ट पेपर मिरच्यांचा वापर करून ते चिकन मॅरिनेट केले आहे, त्यामुळे ते अगदी शेवटपर्यंत मसालेदार लागते. मॅकडोनाल्ड्सचा दर्जा आणि सुरक्षिततेची पातळी पूर्ण करण्यासाठी हे चिकन वेगवेगळ्या 64 चाचण्यांमधून जाते, जेणेकरून थेट पोल्ट्री फार्ममधून ग्राहकांच्या ताटात ते पोहोचवले जाते. मॅकडोनाल्ड्स इंडिया सर्वोत्तम दर्जाच्या चिकनचा वापर पदार्थ तयार करण्यासाठी करते आणि कोणतेही ग्रोथ प्रमोटर्स यात वापरले जात नाहीत.

चिकनच्या नव्या प्रकारात ब्रँडने केलेल्या प्रवेशाबद्दल हार्डकॅसल रेस्टॉरंट्स प्रा. लि. च्या एमडी स्मिता जाटिया म्हणाल्या, ”इतरांपेक्षा वेगळे आणि पठडीबाहेरचे पदार्थ आमच्या ग्राहकांना देण्यासाठी कंपनीच्या स्थापनेपासूनच आम्ही मेन्यूमध्ये संशोधन सुरू केले आहे. आमच्या दक्षिण हिंदुस्थानातील ग्राहकांशी बोलून आम्ही संशोधन केल्यावर आमच्या लक्षात आले की, त्यांना शेवटच्या घासापर्यंत कुरकुरीत, मसालेदार, विशिष्ट चवीचे असे चिकन हवे आहे. या सखोल संशोधनानंतर आम्ही मॅक स्पायसी चिकन बाजारपेठेत आणले आणि ग्राहकांच्या मनासारखा पदार्थ त्यांना दिला. हा नवा पदार्थ बाजारपेठेत आणून आम्हाला संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांतील ग्राहकांना आकर्षित करून घ्यायचे आहे. ग्राहकांच्या प्रतिसादाने आम्ही खूपच आनंदात आहोत आणि भविष्यातील संधींसाठीही सज्ज आहोत.’

आपली प्रतिक्रिया द्या