‘एसएनडीटी’च्या विद्यार्थिनींनीच बनवली दीक्षान्त सोहळ्यासाठी मेडल्स

53

प्रतिनिधी । मुंबई

‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निकच्या ज्वेलरी डिपार्टमेंटमधील विद्यार्थिनींनी दीक्षान्त सोहळ्यासाठी लागणारी मेडल स्वतः तयार केली. विशेष म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानमधील हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा विद्यापीठाने केला.

या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या राज्यपाल डॉ. विद्यासागर राव यांनी ज्वेलरी डिझायनिंग डिपार्टमेंटच्या या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. पदवीदान सोहळ्यासाठी लागणारी मेडल्स ही खास कारागीरांकडून बनवून घेतली जातात, मात्र विद्यार्थिनींच्या अंगीभूत कौशल्यगुणांना वाव देण्यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. विद्यार्थिनींनी हे आव्हान स्वीकारून हा उपक्रम यशस्वी करून दाखवला असे एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या. महिला सक्षमीकरण आणि कौशल्यविकासाच्या युगात एसएनडीटीच्या विद्यार्थिनींना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ नेहमीच अशा उपक्रमांचे आयोजन करते असे ते म्हणाल्या.

तीन आठवड्यांत बनवली ६२ मेडल्स

विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात टॉपर्सना देण्यात आलेली सुवर्णपदके यापूर्वी बाहेरून बनवून घेतली जायची. या वर्षी पहिल्यांदाच डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर किभागाच्या विद्यार्थिनींना ही पदके बनविण्यास सांगण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी सुमारे तीन आठवड्यात ६२ पदके बनवली. यामध्ये धातू प्रक्रियेपासून मेटल शीट बनकणे, एम्बॉसिंग करणे, डिझाईनिंग करणे, कटिंग करण्यापर्यंत सगळी कामे विद्यार्थिनींनीच केली.

आपली प्रतिक्रिया द्या