९०० शेतकऱ्यांची वैद्यकीय तपासणी

16

सामना ऑनलाईन । मुंबई

उन्हातान्हात शेकडो मैल चालून मुंबईपर्यंत आलेल्या शेतकऱ्यांची जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली. डॉक्टरांनी जवळ जवळ ९०० शेतकऱ्यांची तपासणी केली. त्यापैकी २०० ते २५० शेतकऱ्यांच्या जखमांवर औषधोपचार करण्यात आले. याशिवाय डीहायड्रेशनचे १८० रुग्ण, अंगदुखीचे ३५० तर १५० ते २०० अंगदुखी, सर्दी आणि तापाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड, डॉ. रेवत कनिंदे, डॉ. मोनाली चोपडे, डॉ. आकाश वाघमारे, डॉ. प्रीतम नरोड, डॉ. सुमेध जाधव, डॉ. अमर आगमे, डॉ. अश्विनी कुलमेथे, डॉ. प्रीती चिंचोळकर, डॉ. शिवानी डोईफोडे यांच्या पथकाने शेतकऱ्यांची सेवा केली. दरम्यान, रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरासे यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या बळीराजाला फुल न फुलाची पाकळी म्हणून ही वैद्यकीय मदत केल्याचे जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या