देशभरातील मेडिकल कॉलेजेसवर सीसीटीव्हीचा वॉच

38
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात की नाही, प्राध्यापक कॉलेजमध्ये वेळेवर येतात की नाही, कर्मचारी काम करतात की नाही यावर आता सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील मेडिकल कॉलेजेसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे एमसीआयने म्हटले आहे. आरोग्य मंत्री फग्गन सिंह यांनी लोकसभेत नुकतीच ही घोषणा केली आहे.
मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक वेळेवर येतात की नाही हे तपासण्यासाठी बायोमॅट्रिक अटेंडेंस मशीन बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. आतापर्यत देशातील ९० मेडिकल कॉलेजमध्ये ९८५ बायोमेट्रीक मशीन बसवण्यात आल्या आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या