सरकारी कर्मचाऱ्यांना हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख रुपये

534

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी नवीन आजारांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यामध्ये हृदय, यकृत, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यकृत, हृदय, फुप्फुस प्रत्यारोपण प्रत्येकी 15 लाख रुपये, हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण (एकत्र) 20 लाख रुपये, बोन मॅरो ट्रान्सप्लांट 8 लाख रुपये. कॉक्लिअर इम्प्लांटसाठी 6 लाख रुपयांपर्यंत उपचाराच्या खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या