मेडिकलची ‘नीट-पीजी’ परीक्षा चार महिन्यांसाठी स्थगित

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) पुढील चार महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत डॉक्टर्स आणि परिचारिकांची निकड निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली.

‘नीट-पीजी’ परीक्षा पुढे ढकलली गेली तर एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेले डॉक्टर्स कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. परीक्ष काही कळासाठी स्थगित करण्यात आली असली तरी ती घेतली जाणार आहे.  आणि नवे वेळापत्रक विद्यार्थ्यांना एक महिन्यापूर्वीच उपलब्ध करून दिले जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची डय़ुटी लावली जावी तसेच बीएस्सी आणि जीएनएन नर्सिग उत्तीर्ण परिचारिकांना डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली पूर्णवेळ नर्सिंगसाठी घेतले जावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या