इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयात सहा वर्षापासून वैद्यकीय अधीक्षकाच पद रिक्त

505

अगोदरच आरोग्य सुविधांची वाणवा असलेल्या उरण तालुक्यातील एकमेव इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक हे पद मागील सहा वर्षांपासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांवर ही प्रभारी अधिक्षकाची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या गरीब आणि गरजू रूग्णांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

उरण ग्रामीण रूग्णालयाचे तात्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ चाकूरकर यांचे फेब्रुवारी 2014 मध्ये अपघाती निधन झाले.त्यानंतर गेली सहा वर्षे या रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली नाही. उरण शहरात एकमेव इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु हे रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. या रुग्णालयात काही गरीब रुग्णांना तत्काळ व पुढील उपचाराकरिता नवी मुंबई, पनवेल शहरातील रुग्णालयात  जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची, रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड होते आहे. रूग्णालयात अनेक असुविधा आहेत मात्र त्या पुर्ण करण्यासाठी सक्षम अधिकारी नाही.

इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज भद्रे हे 16 जून 2013 पासून डॉक्टर तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ चाकूरकर यांच्या निधनानंतर सदर रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यानी प्रकल्पाच्या माध्यमातून सीएसआर फंडातून किंवा इतर मदतीतून रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले मात्र तरी देखिल हे रूग्णालय असुविधांच्या गर्तेत आहे. विशेष म्हणजे डॉ मनोज भद्रे हे मागील सहा वर्षापासून प्रभारी अधिक्षक म्हणून कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. वास्तविक पहाता एका अधिकार्‍याला तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत एका ठिकाणी ठेवता येत नाही मात्र इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालय हे याला अपवाद आहे. त्यामुळे उरण शहरातील दीड लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक हे पद लवकरात लवकर भरावे अशी मागणी उरणच्या जनतेकडून करण्यात येत आहे. नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यानी यामध्ये लक्ष घालावी अशीही मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या