मीनाताई ठाकरे रक्तपेढीची मोलाची कामगिरी, 34 रक्तदान शिबिरांतून रक्तसंकलन

465

गोरेगाव येथील मीनाताई ठाकरे रक्तपेढीने लॉकडाऊनच्या काळातही मोलाची कामगिरी केली. 34 रक्तदान शिबीरांच्या साहाय्याने 1904 इतके रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. तसेच 1611 रक्तपिशव्या रुग्णांसाठी वितरित करून मोलाचे सहकार्य या रक्तपेढी मार्फत करण्यात आले.

कोरोना रुग्णांसाठी रक्ताची कमतरता भासू नये याकरिता मीनाताई ठाकरे रक्तपेढीमार्फत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध करण्यात येत आहे. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई ठाकरे रक्तपेढी रुग्णांसाठी 365 दिवस 24 तास खुली आहे. मीनाताई ठाकरे रक्तपेढीत कार्य करणाऱया कर्मचारी वर्गाने प्रशासनाला सहकार्य करीत मोठय़ा धाडसाने व कर्तव्य भावनेतून एकत्र येत कोराना व्हायरसच्या संकटाची लढाई लढण्याची तसेच ती जिंकण्याची तयारी दाखवली.

लॉकडाऊनमधील 100 दिवसांची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रक्तपेढीत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाचे कौतुक करत त्यांना करोना वॉरिअर्स प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला. या सन्मान सोहळ्याला प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे, खजिनदार रमेश इस्वलकर, टेक्निकल डायरेक्टर अविनाश शिरोडकर, सह कार्यवाह पद्माकर सावंत, शरद साळवी, गोविंद येतयेकर, अजय नाईक आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या