रक्तदात्यांसाठी आदर्श मीनाताई ठाकरे रक्तपेढी

402

प्रबोधन गोरेगाव संचालित मीनाताई ठाकरे रक्तपेढी नवीन वास्तुत स्थलांतरीत झाली. या नवीन रक्तपेढीचे उद्घाटन उद्योगपती डॉ.नीरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे, खजिनदार रमेश इस्वलकर आदि उपस्थित होते. प्रबोधन गोरेगाव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांचे गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेले समाजसेवेचे कार्य नजीकच्या काळात अधिक जोमाने सुरू होईल आणि पश्चिम उपनगरासह शहरातील विविध रक्तदात्यांना आणि गरजूंसाठी ही रक्तपेढी एक आदर्श ठरेल असा विश्वास हिरानंदानी यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या