अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, महिला आयोगाकडे केली तक्रार

2920
social-media

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची चुलत बहीण व दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्रा हिला काही ट्रोलर्सकडून बलात्काराच्या धमक्या मिळत आहे. मीराने अशा काही ट्रोलर्सचे ट्विट शेअर करून त्यात महिला आयोगाला व हैदराबाद पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अद्याप या प्रकरणी ज्युनियर एनटीआरकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी एका लाईव्ह शोमध्ये मीराने तिला ज्युनियर एनटीआरपेक्षा महेश बाबू हा अभिनेता आवडत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तिला ज्युनियर एनटीआर याच्या फॅन्स तिला व तिच्या पालकांना मारून टाकण्याची तसेच मीरावर अश्लील भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

meera-chopra

या ट्रोलिंगने मीरा वैतागली असून तिने थेट महिला आयोगाकडे याची तक्रार केली आहे.

तिने एका ट्विटद्वारे ज्युनियर एनटीआरला देखील फटकारले आहे. ‘ज्युनियर एनटीआर मला हे कळत नाही की मला तुमच्या पेक्षा महेशबाबू आवडतात म्हणून मी पॉर्नस्टार ठरते, बिच ठरते का? त्यावरून तुझे फॅन्समला व माझ्या पालकांना धमकी देतात. तुला अशा फॅन्समुळे तु यशस्वी झाला आहेस असे वाटते का? मला खात्री आहे की तु माझ्या या ट्विटकडे दुर्लक्ष करणार नाही’, असे ट्विट मीराने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या