गोळ्या संपतील पण आम्ही संपणार नाही – असदुद्दीन ओवैसी

1996

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मेरठमध्ये निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना ‘पाकिस्तानात जा’ असे वक्तव्य मेरठचे एस.पी. अखिलेश नारायण सिंह यांनी केले होते. त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश नारायण सिंह यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. जनतेने गणवेश पाहून तुमचा सन्मान करत तुम्हांला सोडून दिले. 1857 मध्ये मेरठमधूनच हिंदू- मुस्लीमांनी एकत्र येत इंग्रजांना गोळ्या घातल्या होत्या. एसपी साहेब, तुमच्या गोळ्या संपतील पण आम्ही संपणार नाही. आता दुसरी हिजरत होणार नाही. आम्ही कोठेही जाणार नाही, असे ओवैसी यांनी सांगितले आहे.

एस.पी. अखिलेश नारायण सिंह यांच्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी सिंह यांची पाठराखण केली आहे. तर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील काही भाजप नेत्यांनी सिंह यांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला. आपण अखिलेश नारायण सिंह यांच्या पाठिशी उभे असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी सांगितले. तर नक्वी यांनी एस.पी. यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते निषेधार्ह आहे. त्यांच्यार तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तर काँग्रेस, बसपा आणि एमआयएमने सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलन ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी नारेबाजी करत असल्याने आपल्याला ते वक्तव्य करावे लागले, असे सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या