रविवार म्हटलं की कुटुंब आणि मित्रांसमवेत फिरायला जाण्याचा दिवस. यासाठी सर्वात सोयिस्कर पर्याय म्हणून रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य दिले जाते. या रविवारी (9 जून 2024) तुम्ही असा काही प्लॅन करत असाल तर, थांबा. कारण सेंट्रल रेल्वेवर मेगाब्लॉक आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घ्या.
पश्चिम रेल्वेवर पुढील प्रमाणे जम्बो ब्लॉक असेल
पश्चिम रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, 9 जून, 2024 रोजी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत अप आणि डाउन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील. त्यामुळे, काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहतील आणि काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड/रिव्हर्स केल्या जातील.
सेंट्रल रेल्वेवर मेगा ब्लॉक पुढीलप्रमाणे असेल
मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. 9 जुन 2024 रविवार रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.04 ते दुपारी 2.46 पर्यंत डाउन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या दरम्यान रेल्वे भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबेल आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. घाटकोपर येथून सकाळी 11.14 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबेल.
डाउन धीम्या मार्गावर
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण लोकल असेल जी सकाळी 10.48 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणार आहे.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.09 वाजता सुटणार आहे.
अप धीम्या मार्गावर
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी 9.55 वाजता सुटणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा लोकल असेल जी कल्याण येथून दुपारी 2.08 वाजता सुटणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
डाउन हार्बर मार्गावर
- ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.04 वाजता सुटेल.
- गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 4.51 वाजता सुटेल
- ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 4.56 वाजता वांद्रेसाठी सुटेल.
अप हार्बर मार्गावर
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 9.40 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.28 वाजता सुटेल.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 4.58 वाजता सुटेल.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.