Mega Block News : मुंबईत रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

रविवारी 16 जून 2024 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार असून मध्ये रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक

सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10:25 ते दुपारी 2:45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी 10:50 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.

डाऊन धिम्या लाइनवर

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून सकाळी 10:20 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल सीएसएमटी येथून दुपारी 3:03 वाजता सुटणार आहे.

अप धिम्या लाइनवर

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल. जी सकाळी 11:10 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल सीएसएमटी येथे दुपारी 3:59 वाजता पोहोचेल.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत

पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सकाळी 10:34 ते दुपारी 3:36 पर्यंत सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10:16 ते दुपारी 3:47 वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल, बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

डाऊन हार्बर मार्गावर

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10:18 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल सीएसएमटी मुंबई येथून दुपारी 3:44 वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्गावर

सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10:05 वाजता पनवेल येथून सुटणार आहे.
सीएसएमटी मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3:45 वाजता सुटणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणाताही ब्लॉक नसणार

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री, म्हणजे 15-16 तारखेला वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान 23.30 ते 04.45 वाजेपर्यंत अप आणि डाउन फास्ट मार्गांवर जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील गाड्या विरार आणि भाईंदर-बोरिवली दरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.