विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्ये रेल्वेच्या वतीने उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर ब्लॉक असणार आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.03 वाजता सुटेल.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक (नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल किंवा बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी 4.52 वाजता पोहोचेल. अप ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 4.26 वाजता सुटेल आणि सायंकाळी 5.20 वाजता ठाणे येथे पोहोचेल.
- ब्लॉक कालावधीत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.