आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

400

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर विविध तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात बोरीवली ते वसई/विरार दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल गाडय़ा या धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. जम्बो ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द केल्या जातील.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत ब्लॉक असणार आहे. कल्याणहून सकाळी 10.54 ते दुपारी 3.52 या काळात सुटणाऱ्या उपनगरी रेल्वे कल्याण ते ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील व ठाण्यापर्यंत सर्व मागांवर थांबतील. ठाणे ते सीएसएमटी दरम्यान जलद रेल्वे नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांत थांबतील.

सीएसएमटी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.22 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. या काळात डाऊन व अप जलद गाड्या 20 मिनिटे उशिराने, तर सकाळी 11 ते 5 दरम्यानच्या सर्व धिम्या रेल्वे 15 मिनिटे उशिराने धावतील. मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/ एक्स्प्रेस 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 या वेळेत सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी तर सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व उपनगरी रेल्वे सेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

आपली प्रतिक्रिया द्या