‘गोडसे’ नावाचा तेलुगू चित्रपट येणार, अभिनेता चिरंजिवीने केला टीझर प्रदर्शित

तेलुगू चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अशी ओळख मिरवणाऱ्या चिरंजिवी याने एका नव्या तेलुगू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ट्विटरवरून त्याने हा टीझर प्रसिद्ध केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सत्यदेव आणि अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी हे दोघे प्रमुख भुमिकेत आहेत. या टीझरमध्ये पोलीस अधिकारी असलेली ऐश्वर्या लक्ष्मी ‘गोडसे कोण आहे, इथे काय झालं होतं हे मला आधी कळालं पाहिजे; नंतर मी त्याला हाताळू शकेन’ असा संवाद फेकताना दिसत आहे.

अभिनेता सत्यदेव याने या चित्रपटामध्ये गोडसे हे नाव धारण केलेले असते आणि तो भ्रष्ट राजकारण्यांना ठार मारत असतो असं कथानक दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या एका तासात त्याला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.