पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; मेघना पेठे, मलिका अमर शेख,शीतल साठे मानकरी

556

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे 2019चा  ‘दया पवार स्मृती पुरस्कारप्रसिद्ध कथाकादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्रीलेखिका मलिका अमर शेख आणि नव्या पिढीच्या लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला. हा पुरस्कार सोहळा 20 सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. यंदाचा हा 23 वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गतवर्षीबलुतंच्या चाळिशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृतबलुतंपुरस्कार सुरू करण्यात आला होता. या वर्षी तो रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांनाउष्टंया अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओम्प्रकाश वाल्मीकी यांच्या ख्यातनामजूठनया आत्मकथनाचा मंगेश बनसोड यांनी मराठी अनुवाद केला आहे.

या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकारकथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या