उजळ वाटांचा सोबती, अपूर्व मेघदूत !

68

<<  प्रेरणा  >>  शुभांगी बागडे

१९ अंध कलाकारांना सोबत घेत महाकवी कालिदासाचे अपूर्व मेघदूत रंगभूमीवर आणले आहे दिग्दर्शक स्वागत थोरात आणि लेखक गणेश दिघे यांनी. रंगभूमीच्या इतिहासातील हा दुर्मिळ प्रयोग ९ जानेवारी १७ रोजी विलेपार्लेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात. आपल्या कलाविष्कारातून डोळसांनाही लाजवेल असा हा प्रयोग असेल हे नक्की.

आर्किटेक्ट, वन्यजीव छायाचित्रकार, नाटय़दिग्दर्शक स्वागत थोरात यांची महत्त्वाची ओळख आहे ते त्यांनी अंधांसाठी केलेलं मोलाचं काम. दृष्टिहिनांना जगाच्या अधिक जवळ आणण्यासाठीची त्यांची धडपड स्पर्शज्ञान या ब्रेल लिपीतील पहिल्या नियतकालिकाद्वारे साकारली गेली आणि पुस्तकांच्या विश्वात रममाण होण्याची संधी दृष्टीहिनांना लाभली. नुकतीच लुई ब्रेल यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त स्वागत थोरात यांच्या भरीव कार्याचा हा वेध.

स्वागत थोरात यांची अंधांच्या जगाशी ओळख झाली ती १९९३ मधील ‘काळोखातील चांदणे’ या शैक्षणिक डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने. दूरदर्शनच्या बालचित्रकाणीसाठी बनवलेल्या डॉक्युमेंटरीत अंधांसोबत काम करताना स्वागत यांना त्यांच्या जगाची, त्यांच्या जगण्याची एक केगळीच ओळख घडली.

या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने दृष्टीहीनांसोबत केळ घालकताना त्यांना जाणकलं, की दृष्टी नसली तरी यांच्यात अनेक कौशल्य दडलेली आहेत. विविध कलात्मक गोष्टी साकारण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांच्यातील कलागुणांचा विकास करत स्कागत यांनी या कलाकारांसोबत काम करायला सुरुकात केली. याच दरम्यान त्यांनी स्कातंत्र्याची यशोगाथा हे नाटक बसकलं. यात 88 दृष्टिहीन कलाकार सामील होते. या नाटकाने गिनीज बुक ऑफ कर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये आपली नोंद केली. नाटकाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही कौतुकाची पोचपाकती मिळाली. नाटकाचे प्रयोग होत होते. प्रेक्षकांची पसंती मिळत होते. त्यावेळी स्वागत यांच्या लक्षात आलं की, हे सर्व कलाकार खूप काही काचत असत परंतु दर्जेदार साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडसर येतोय. कारण त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतील साहित्यच उपलब्ध नाही. ब्रेल लिपीद्वारे हे साहित्य या दृष्टीहीनांपर्यंत पोहोचवण्याचं स्वागत यांनी ठरवलं. याची सुरुवात झाली ती स्पर्शगंध या दिवाळी अंकाद्वारे.

ब्रेल पिलीतील पहिला दिवाळी अंक स्पर्शगंध स्वागत यांनी सुरू केला. याला इतका प्रतिसाद लाभला की काही दिवसातच स्पर्शगंध च्या तीन किशेष आकृत्ती संपादित कराव्या लागल्या. यात अनेक मराठीतील अलेक मान्यवर लेखकांचं साहित्य उपलब्ध करण्यात आलं. त्यानंतर स्वागत यांनी लेखिका सुनिता देशपांडेंच्या यांच्या मदतीने पु.लं च्या काही कथासुद्धा संपादित केल्या. याबरोबरच पु.लं.च्या तीन पैशाचा तमाशा या नाटकाचं ४४ दृष्टिहीन कलाकारांना घेऊन दिग्दर्शनही केलं.
स्वागत यांना इथपर्यंतच थांबायचं नक्हतं तर अंधांसाठी काहीतरी ठोस आणि भरीक कार्य करायचं होतं. याचवेळी त्यांनी

ब्रेलमध्ये कृत्तपत्र सुरु करायचं ठरकलं. हिंदुस्थानातील अशा प्रकारचं हे पाहिलं कृत्तपत्र आहे. यासाठी त्यांनी स्वतŠ भांडवल उभं केलं. नधी गोळा करणं, ब्रेल छपाई मशिन्स आणणं अशा अनेक पातळ्यांवर सरशी करत त्यांच्या स्पर्शज्ञान या पहिल्या ब्रेल लिपीतील वृत्तपत्राच प्रत फेब्रुकारी २००८ मध्ये प्रसिद्ध झाली. हे कृत्तपत्र, दृष्टीहिनांना त्यांच्या आसपास घडणाऱया ताज्या घटनांचा कृत्ताद्वारे स्पर्श करकून आकलन करण्याकर भर देते. त्याचसोबत कन्यजीक संकर्धन, पर्याकरण , राजकीय हालचाली, प्रेरक आत्मचरित्रं, सामाजिक मुद्दे , आंतरराष्ट्रीय घडामोडी , शैक्षणिक आणि भकितक्यातील संधी अशा अनेक गोष्टी या काचकांना या कृत्तपत्रात मिळतात.

स्पर्शज्ञान हे भारतातील पहिले नोंदणीकृत मराठी ब्रेल नियतकालिक. भारतासारख्या खंडप्राय देशात ब्रेलमधील नियतकालिक सुरू क्हायला देश स्कतंत्र झाल्यानंतरही साठ कर्षे उलटाकी लागली. पण स्वागत थोरातांसारख्या व्यक्तींच्या कार्याने डोळस माणसांच्या दृष्टीत आणि संकेदनशीलतेत नेत्रहीन माणसांच्या जगण्याबद्दलची सजगता आली. आजमितीला ’स्पर्शज्ञान’कडे १५ भारतीय भाषांसह जगातील १३० भाषांचं ब्रेल रुपांतर करण्याची सोय आहे. याचंच पुढचं पाऊल म्हणजे देशभरातील अंधांसाठी ब्रेल लिपीतील ‘रिलायन्स दृष्टी’ हे रिलायन्स फाउंडेशनचे पाक्षिक. मार्च २०१२ पासून स्वागत या हिंदी ब्रेल पाक्षिकाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत.

स्वागत यांच्या कामाची दखल त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमधून आपल्याला पाहायला मिळतेच. प्रकाशवाटा उजळवणारं त्यांचं काम खचितच मोठं आहे. अंधांसाठीचं आपलं काम व स्पर्शज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या