आशिया खंडातील सर्वात उंच मूर्ती असलेल्या श्री शारंगधर बालाजीच्या प्राणप्रतिष्ठापनास 107 वर्षे पूर्ण

1318

आशिया खंडातील सर्वात उंच समजण्यात येणाऱ्या मेहकर मधील भगवान श्री शारंगधराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना विधीस २७ मे ला १०७ वर्षे पूर्ण होऊन १०८ वे वर्ष सुरू होत आहे. ही मूर्ती बघण्यासाठी सतत ईतर जिल्ह्यातील भक्त मेहकरला येत असतात.

भगवान शारंगधरांचे पुर्नप्राणप्रतिष्ठापनेचे अष्टोत्तरशत वर्ष [१०७ वर्ष पुर्ण होवून १०८वे वर्ष ] प्रारंभ २७ मे पासून सुरू होत आहे. भगवान शारंगधरांची मुर्ती इ.स. १८८८मध्ये खोदकाम करताना मेहकरात सापडली होती . ११ फूट उंच ,रेखीव व आकर्षक मूर्ती बघून तत्कालीन इंग्रजांनी ही मूर्ती लंडनच्या म्युझियम मध्ये नेण्याचे ठरवले होते. मात्र मेहकरवासियांनी विरोध केला. इंग्लंड मध्ये भगवंताला नेऊ नये म्हणून तिची स्थापना करण्यात आली होती. ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके१८३५ [इ.स.१९१३] मध्ये प.पू. अण्णासाहेब गिरोलीकर महाराज व परीसरातील विद्वान ब्रह्मवृंद यांच्या हस्ते शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली होती. तेव्हापासून भगवंत आपल्याला कृपाप्रसाद देण्यासाठी मेहकर याठिकाणी स्थितआहे. तो योग दि.२७/५/२०२० बुधवारला येत आहे.

लॉकडाऊनमुळे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद आहे. त्यामुळे सर्व भक्तांना उपासना घरीच करावी लागते आहे.आज दि.२७/५/२०२० बुधवारला आपल्या घरीच भगवंताच्या प्रतिमेचे पुजन करुन भगवंताला अष्टोत्तर शतनामावली म्हणत पूजन करावे असे आवाहन शारंगधर बालाजी संस्थानने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या