मेहकर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी क्वॉरंटाइन; कारभार जानेफळकडे सोपवला

990

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस ठाण्यामधील एक अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह सर्व 50 कर्मचारी, 20 होमगार्ड, 5 विशेष पोलीस अधिकारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच या पोलीस ठाण्याचा कारभार जानेफळ पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे.

मेहकर पोलीस ठाण्यात एक अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. या ठाण्यात अधिकारी व कर्मचारी असे एकूण 54 जण आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच 20 होमगार्ड आणि 5 विशेष पोलीस अधिकारी यांना मेहकर येथे कोवीड केअर सेंटरमध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या रॅपीड टेस्ट होणार आहेत. तर पोलीस ठाण्याचा कारभार जानेफळ पोलीस ठाण्याकडे देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या