शहीद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्य चक्र

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूरचे सुपुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांना मरणोत्तर शौर्य चक्र घोषित करण्यात आले आहे. आज (सोमवार) दिल्ली येथील लष्करी मुख्यालयातून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

मेजर कुणाल गोसावी यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना वीरमरण आले होते. गोसावी यांनी सैन्यदलात असताना केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी हिंदुस्थानी लष्कराकडून मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराची घोषणा करण्यात आली. गोसावी यांना मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्काराची घोषणेनंतर पंढरपूरकरातून समाधान व्यक्त करण्यात आले.