२३ जानेवारी पर्यंत लातूर जिल्ह्यात युवासेनेची सदस्य नोंदणी अभियान

17

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर जिल्ह्यात २३ जानेवारी पर्यंत युवासेनेच्यावतीने सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती युवासेनेचे सहसचिव तथा लातूर जिल्हा विस्तारक प्रा.सुरज दामरे यांनी दिली.

लातूर येथील शासकीय विश्रामगृहावर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना प्रा. सुरज दामरे यांनी सांगीतले की, लातूर जिल्ह्यात युवासेनेची संघटनात्मक बांधणी मजबुत करण्यावर सर्व पदाधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रित करावयाचे आहे. सर्व गट तट बाजूला ठेऊन पक्षाचे काम एकत्रितपणे करावयाचे आहे. २३ जानेवारी पर्यंत जिल्ह्यात युवासेनेची सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात युवा सेनेची शाखा स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीस युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. श्रीनिवास मातोळकर, कुलदिप सुर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, युवासैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या