छळग्रस्त पुरूषांच्या वाटेला मरण यातना, पोलिसांकडून ना दाद ना फिर्याद

1063
प्रातिनिधीक फोटो

ब्रिजमोहन पाटील, पुणे

फक्त पुरूषच महिलांचा छळ करतात असे नाही, महिलाही पुरूषांचे अतोनात हाल करतात. याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असून, दरवर्षी या आकड्यात जवळपास दुपटीने भर पडत आहे. मात्र, सर्वच कायदे महिलांच्या बाजूने असल्याने पुरूषांच्या या तक्रारींची ‘ना दाद ना फिर्याद’ अशी अवस्था आहे. छळग्रस्त पुरूष मरण यातन भोगत असताना सरकारी पातळीवरही त्यांना न्याय मिळत नाही.

atul-tapkir‘ढोल ताशे’ चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी रविवारी मध्यरात्री प्रभात रस्त्यावरील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये विष प्राषन करून आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी त्यांची पत्नी प्रियंका, तिच्या मैत्रिणी, भाऊ यांच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. तसेच यामध्ये त्यांनी ‘मुख्यमंत्रीसाहेब पोलीस ज्या प्रमाणे महिलांचे ऐकून घेतात, त्याचप्रमाणे पुरूषांचेही ऐकून घेतले पाहिजे. मला अटक होऊ नये म्हणून पोलिसांना १० हजार रूपये द्यावे लागले असेही नमूद केले आहे. यापार्श्वभूमीवर पुरूष हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

‘कलम ४९८ अ’, पोटगिचा अधिकार,  १९९५चा घरगुती हिंसचार प्रतिबंध कायदा हे सर्व कायदे फक्त महिलांच्या बाजूने आहे. त्याचा महिलांकडून गैरवापर सुरू आहे. महिलांचे हट्ट न पुरविल्याने, त्यांचे म्हणने न ऐकल्यास, एखाद्या गोष्टीला विरोध केल्यास महिलांकडून या कायद्यांचा गैरवापर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून, रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहू नये, सकाळी लवकर उठावे यासाठीही वडीलांनी मुलांना रागविल्यास विंâवा मारल्यास त्याच्या विरोधातही महिला पोलिसांकडून तक्रार करून पुरूषांना त्रास देतात.

पुणे पोलिसांच्या महिला सहाय्यता कक्षाकडे महिलांप्रमाणे पुरूषांचेही अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. २०१५ मध्ये १ हजार २८४ तक्रार अर्ज आले होते. त्यामध्ये १९७ पुरूषांचे तक्रार अर्ज होते. २०१६ मध्ये एकुण १ हजार ८५१ तक्रार अर्ज आले होते. त्यात पुरूषांंच्या अर्जांची संख्या ३२८ इतकी होती. पण यातील एकाही अर्जावर सुनावनी करून कायदेशीर कारवाई न केल्याने या तक्रारदार पुरूषांना न्याय मिळालेला नाही, असे महिला सहाय्यता कक्षातील पोलीस अधिकारीही मान्य करतात.

पुरूष आयोग नेमावा
महिलांच्या सुरक्षेसाठी ज्या प्रमाणे महिला आयोग स्थापन केला आहे, त्याच प्रमाणे पुरूष आयोग स्थापन करावा. महिलांकडून कायद्याचा गैरवापर सुरू असून, त्यामध्ये पतीसह त्यांच्या कुटूंबीयांनाही त्रास सहन करावा लागतो. काही दिवसांपूर्वी उंड्री येथे आत्महत्या केलेल्या कपिल पाटील यांच्या कटूंबीया विरोधात पत्नीने कौटूंबीक हिंसाचार विरोधी कायद्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात सर्वांची निर्दोष सुटका झाली. गेल्या ११ वर्षात पुरूषांच्या वतीने सुमारे १२०० केससे न्यायालयात लढलो आहे, त्यात बNयाच प्रकरणात पुरूष निर्दोष सुटले आहेत. असे अ‍ॅड. संतोष शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या