लांजा – माथेफिरू तरुणाचा 7 जणांवर कोयत्याने सपासप वार

माथेफिरु तरुणाने 7 जणांवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना लांजा तालुक्यातील देवधे गुरववाडी येथे घडली. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेत पाच महिला, एक वयोवृद्ध आणि एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद गुरव नावाच्या माथेफिरू तरुणाने क्षुल्लक वादातून घराशेजारी राहणाऱ्यांवर कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये अस्मिता संदीप गुरव (34), भास्कर दत्ताराम पाटकर (53), शुभांगी भास्कर पाटकर (52) अक्षता आशिष गुरव (24), आयुष आशिष गुरव (5), प्रतिभा अशोक गुरव (52), सुलोचना मारुती गुरव (61) हे गंभीर जखमी झाले आहेत, तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठत हल्ल्याची कबुली दिली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या