नाश्त्याला उशीर झाला म्हणून मुलाने केली आईची हत्या

43
file photo

सामना ऑनलाईन । झारखंड

सकाळचा नाश्ता द्यायला उशीर झाला म्हणून एका २१ वर्षीय तरुणाने त्याच्या आईची बांबूने मारहाण करून हत्या केल्याची घटना झारखंडमधील धनबाद येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे मात्र त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने त्याला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धनबाद जिल्ह्यातील तिलकोरोयिधी या गावात सदर तरुण त्याची आई, बहिण व बायकोसोबत राहायचा. गेल्या काही दिवसांपासून तो सतत चिडचिड करत होता, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबीयांसोबत वाद घालत होता. त्यााची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याच्यावर एका स्थानिक मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याने आईकडे नाश्ता मागितला. मात्र आईला नाश्ता द्यायला उशीर झाल्याने तो चिडला व त्यानंतर त्याने आईशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावरून संतापलेल्या त्या तरुणाने आईला मारहाण करायला सुरुवात केली. आधी लाथाबुक्क्याने माारल्यानंतर त्याने घराबाहेरून बांबू आणला व बांबूने आईला मारायला सुरुवात केली. या मारहाणीत आईचा मृत्यू झाला. त्याचवेळी आरडाओरडा ऐकून शेजारी त्यांच्या घराबाहेर जमा झाले होते. त्यामुळे घाबरलेल्या त्या तरुणाने पळून जायचा प्रयत्न केला मात्र शेजारच्यांनी त्यालाा पकडून एका खोलीत डांबून ठेवले.

पोलीस घटनास्थळी आाल्यानंतर त्याांनी त्याला ताब्याात घेतले असून वैद्यकीय तपासणीसााठी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या