‘मर्सिडीज बेंझ’चा मार्केटमध्ये सलग सातव्या वर्षी दबदबा

देशातील आघाडीचा लक्झरी ऑटोमोबाईल ब्रॅण्ड ‘मर्सिडीज बेंझ’ने सलग सातव्या वर्षी लक्झरी कार मार्केटमधील आपला दबदबा कायम राखला आहे. गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2021 दरम्यान ‘मर्सिडीज बेंझ’ने लक्झरी कारच्या विक्रीत दमदार प्रगती दाखवून दिली आहे. या कालावधीत 11,242 कारची डिलीव्हरी करण्यात आली. त्याआधीच्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये ‘मर्सिडीज बेंझ’ने 7,893 कार वितरित केल्या होत्या. त्यावेळी कोरोना महामारीच्या परिणामामुळे कारच्या कमी विक्रीची नोंद झाली होती. मात्र 2021 मध्ये 2020 मधील विक्रीच्या तुलनेत 42.5 टक्क्यांनी कार विक्री वाढली आहे. कार मार्केटमधील या कामगिरीबद्दल आम्ही उत्साहित आहोत, अशी प्रतिक्रिया मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी दिली आहे.