कुठे आहे मंदी? एका दिवसात 200 मर्सिडीज विकल्या

1275

वाहन क्षेत्राच्या मानगुटीवर बसलेल्या मंदीला मर्सिडीज बेंझने दसऱ्याच्या मुहूर्तावर धडक दिली. कंपनीने मंगळवारी एकाच दिवसात मुंबईसह गुजरात व इतर शहरांमध्ये 200 हून अधिक गाडय़ांची विक्री केली. ग्राहकांनी नवरात्री आणि दसऱ्याचा मुहूर्त साधून गाडय़ांची बुकिंग केली होती, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन श्र्वेंक यांनी दिली.

Bajaj Auto ची चेतक स्कूटर पुन्हा येतेय, मात्र एका जबरदस्त बदलासह

मारुती सुझुकी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्ससारख्या नामवंत कंपन्या आर्थिक मंदीमुळे बेजार झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मर्सिडीज बेंझने दसऱ्याच्या मुहूर्तावर 200 हून अधिक गाडी विक्रीचा चमत्कार केला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कंपनीला अपेक्षेनुसार मोठा प्रतिसाद लाभला.

‘ही’ स्कूटर देते फक्त 20 पैशात 1 किलोमीटरचा मायलेज  

 

कुठे किती विक्री

  • मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 125 हून अधिक गाडय़ांची विक्री झाली, तर गुजरातमध्ये 74 गाडय़ांची डिलिव्हरी करण्यात आली.
  • कंपनीने सी आणि ई श्रेणीतील सेडानसह जीएलसी आणि जीएलई यांसारख्या एसयूव्ही गाडय़ांचीही डिलिव्हरी केली.
  • दुसरीकडे, 3 कोटींच्या घरात किंमत असलेल्या इटलीच्या ’लॅम्बोर्गिनी’चीसुद्धा दर आठवडय़ाला एक अशी विक्री होत आहे.

‘CNG’ कार चालविण्याचे ‘हे’ आहेत मोठे फायदे! वाचा…

 

आपली प्रतिक्रिया द्या