मर्सिडीज बेंज सुसाट…कोरोनाकाळात तीन कोटीच्या 50 गाड्यांची विक्री

कोरोनाकाळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. यात कार उत्पादकांना त्याचा फटका सहन करावा लागला. मात्र अशातच मर्सिडीज बेंझचे नवे मॉडल भाव खाऊन गेले आहे. मॉडेल मार्केटमध्ये येण्यापूर्वीच 3 कोटींच्या तब्बल पन्नास गाड्या आधीच बुक झाल्या आहेत.

जर्मनीची आलिशान कारची निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने अल्ट्रा लग्जरी SUV Mercedes-Maybach GLS 600 4MATIC हिंदुस्थानात लॉन्च केली. मात्र मार्केटमध्ये येण्यापूर्वीच मर्सिजीच्या एसयूव्ही श्रेणीला हिंदुस्थानातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन कोटी किंमत असलेली 50 कार आधीच बुक करण्यात आल्या आहेत. कार बुक करणाऱ्यांमध्ये सिनेकलाकार, व्यवसायिक आणि खेळाडूंचा समावेश आहे. Mercedes-Maybach A class नंतर हिंदुस्थानात मेबॅकचे हे दुसरे मॉडेल आहे, या आलिशान एसयूव्हीची किंमत 2 कोटी 43 लाख असून रोड टॅक्स आणि विम्याचा समावेश करुन ही किंमत तीन कोटी होते.

मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 4MATIC एसयूव्हीमध्ये 3,982 सीसी चे व्ही8 इंजिन दिले आहे जे 6000-6500 आरपीएमवर 410 केडब्ल्यू (557 एचपी) ची पावर आणि 2500-4500 आरपीएमवर 730 एनएम टॉर्क उत्पन्न करते. याच्या शक्तिशाली इंजिनच्या मदतीने ही कार अवघ्या 9.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तर या आलिशान एसयूव्हीचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

आपली प्रतिक्रिया द्या