‘मेसेंजर ऑफ गॉड’च्या प्रसारणाला बंदी घाला, अनिल देशमुख यांचे केंद्राला पत्र

1663
anil-deshmukh

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ‘मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 21 जुलै रोजी होणाऱया प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रझा अकादमी या संस्थेने सायबर विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून सरकारने केंद्राला पत्र पाठवले आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणारा तसेच एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारा हा चित्रपट सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित न करण्याच्या केलेल्या तक्रारीनुसार मी गृहमंत्री या नात्याने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयास हा चित्रपट सोशल मीडिया/ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होऊ न देण्याची पत्राव्दारे विनंती केल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच यूटय़ूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला हा चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी सूचनाही अनिल देशमुख यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या