अर्जेंटीनामध्ये मेस्सीचा पुतळा तोडला

56

सामना ऑनलाईन, ब्युनोस आयर्स

अर्जेंटीनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीचा ब्युनोस आयर्समध्ये उभारण्यात आलेला पुतळा अज्ञात व्यक्तींनी तोडून टाकलाय. पुतळ्याचं डोकं,हात हे भाग तोडून टाकण्यात आलेत.

ही बातमी कळताच मेस्सीचा पुतळा झाकून ठेवण्यात आला असून, तो पुन्हा उभारण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं. आहे. अर्जेंटीनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातून मेस्सीनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचा पुतळा उभारण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र नंतर मेस्सीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता.

messi

ब्युनोस आयर्सच्या ग्लोरी रस्त्यावर अर्जेंटीनाच्या जगप्रसिद्ध खेळाडूंचे पुतळे उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये मेस्सीचाही पुतळा होता. मेस्सीशिवाय इथे टेनिसपटू गॅब्रिएला सबातिनी आणि बास्केटबॉलपटू मॅन्युअल जिनोबिलीचाही पुतळा उभारण्यात आलेला आहे. समाजकंटकांपासून या पुतळ्याना वाचवणं हे इथल्या स्थानिक प्रशासनासमोर आणि पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान बनलं आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या