आता मेटल स्टेंट सात हजारांना मिळणार

48

मुंबई – हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी खूशखबर आहे. या रुग्णांवर अँजिओप्लास्टीसाठी लागणाऱया स्टेंटच्या किमती जवळपास ८५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. नव्या किमतीनुसार मेटल स्टेंट्स ७ हजार २६० रुपयांना तर बीव्हीएस स्टेंट २९ हजार ६०० रुपयांना मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार स्टेंटच्या किमती पूर्वीपेक्षा कमी करण्यात आल्या आहेत. एनपीपीए म्हणण्यानुसार स्टेंटच्या किमती ठरविणे गरजेचे होते. तसेच अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये कोरोनरी स्टेंट्सचा समावेश करण्यात आला आहे.

नफ्यासाठीच स्टेंटच्या भरमसाट किमती

सध्या एका स्टेंटस्ची बाजारात किंमत २५ हजारांपासून ते १ लाख ९८ हजार इतकी आहे. या स्टेंटच्या विक्रीतून रुग्णालय तब्बल ६५४ टक्के इतका नफा कमवत होते. त्यामुळे सामान्य रुग्णांची आर्थिक लुबाडणूकच सुरू होती. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांना सहज स्टेंट उपलब्ध व्हावेत यासाठी स्टेंटच्या किमतींवर निर्बंध टाकण्यात आले आहेत.

अँजिओप्लास्टी करताना हृदयातले ब्लॉक मिटविण्यासाठी स्टेंटचा वापर केला जातो.

छोटय़ाशा नळीच्या आकाराचा स्टेंट हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया वाहिनीत बसवला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या