मेट्रोत अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाची महिलेकडून खरडपट्टी, व्हिडीओ व्हायरल

2631

दिल्ली मेट्रोमध्ये प्रेमी जोडप्यांचे अश्लील चाळे ही आता नेहमीची बाब झाली आहे. बऱ्याचदा या कृत्यांचे व्हिडीओही व्हायरल होतात. पण, तरीही असे प्रसंग घडणं काही थांबत नाही. मात्र, नुकताच एक वेगळा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यात एक महिला अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाची खरडपट्टी काढताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रेमी युगुल भर गर्दीत अश्लील कृत्य करत होतं. कुणीही त्यांना रोखायचा प्रयत्न केला नाही. पण, ते पाहून तिथेच उभ्या असलेल्या एका महिलेचा पारा चढला. घरचे संस्कार विसरलात का, असं विचारत या महिलेने भर गर्दीतच त्यांना रागे भरायला सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी असं वागणं चूक आहे, असं करू नका, असंही त्या म्हणाल्या. त्यावर त्या युगुलाने आम्ही सज्ञान आहोत, असं प्रत्युत्तर दिलं. त्या उत्तराने महिलेचा पारा आणखी चढला. तरुणीला चांगलं धोपटून काढायची धमकी देत महिलेने तरुणाला नालायक आणि उनाड म्हटलं.

महिलेचा वाढता आवाज ऐकून उपस्थित प्रवाशांनी महिलेला शांत राहण्याची विनंती केली. पण, ती युगुलाची खरडपट्टी काढत राहिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेचं कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कुणीतरी पुढे झालं, अशा शब्दात नेटकऱ्यांनी या महिलेची स्तुती केली आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या