FIFA World Cup – प्रिये, माफ कर! लग्नासाठी जमवलेली पुंजी विश्वचषकासाठी उडवली

प्रिये, मला माफ कर. आपल्या लग्नासाठी जमवलेली सर्व पुंजी मी कतारचा फिफा फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी खर्च केलीय, असे फलक झळकावत मेक्सिको संघाच्या एका चाहत्याने आपल्या होणाऱ्या पत्नीची जाहीर माफी मागितली आहे. विशेष म्हणजे ज्या संघासाठी तो कतारला आलाय त्या संघाची स्पर्धेतील कामगिरीही तशी लक्षणीय झालेली नाही. मेक्सिकोला आता अखेरच्या लढतीत सौदी अरेबियाशी झुंजायचे आहे. सध्या संघही आव्हान राखण्याच्या अडचणीत आणि हा फुटबॉलवेडा युवकही अडचणीत अशी दोघांची गत झाली आहे.