व्हिडीओ गेममध्ये हरला, दहा वर्षाच्या मुलाने अकरा वर्षाच्या मुलावर झाडली गोळी

मेक्सिकोमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडीओ गेममध्ये हरल्याने एका दहा वर्षाच्या मुलाने अकरा वर्षाच्या मुलावर गोळी झाडून हत्या केली आहे. गोळी झाडणारा मुलगा समवयाचा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गॅंगवारसाठी वेराक्रूझ प्रसिद्ध आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ गेममध्ये मित्राने हरवल्याने राग अनावर होऊन 10 वर्षांच्या मुलाने बंदूक बाहेर काढली आणि 11 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात गोळी झाडली. घटनेनंतर बालकासह त्याचे कुटुंबीय पळून गेले.

मृत मुलाच्या आईने आरोप केला आहे की, 10 वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांनी टेबलवर बंदूक सोडली होती. मुलाचा मृत्यूसाठी त्या मिलसोबत त्याचे पालकही तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी बेजबाबदारपणे टेबलावर बंदूक सोडली होती,” असे पीडितेच्या आईच्या हवाला देत वृत्तसंस्थेने म्हटले आहे.