महापौरपदाच्या उमेदवाराचा खून, शहरातील सर्व पोलीस दलाला अटक

सामना ऑनलाईन । ओकांपो

एखाद्या गुन्ह्याप्रकरणी शहरातील संर्व पोलील दलालाच अटक केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहेत का? ह्या… हे कसे शक्य आहे असे तुम्ही म्हणाल. परंतु मेक्सिकोतील ओकांपो या शहरातील सर्व पोलीस दलाला एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. ओपांको शहरामध्ये महापौरपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शहरतील पोलीस खात्यामधील सर्व अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात महापौरपदासाठी निवडणूक सुरू आहे. याच निवडणुकीसाठी उभ्या असलेला उमेदवार फर्नांडो हुआरेज यांची गेल्या आठवड्यातील गुरुवारी तीन हल्लोखोरांनी निर्घृण हत्या केली होती. प्रचाराच्या तयारीत असतानाच हल्लोखोरांनी फर्नांडो यांना गोळ्या घातल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. फर्नांडो यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी शहरातील नागरी सुरक्षा विभागाचे प्रमुख ऑस्कर गोंझालेझ गार्सिया यांना चौकशीसाठी समन्स बजावले. परंतु, स्थानिक पोलिसांनी या कारवाईला विरोध दर्शवला. पोलिसांनी कारवाईदरम्यान हवेत गोळीबारही केला. अखेर सुरक्षा दलाने पोलीस दलातील २७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या