युवकाने घेतल्या बैलांची सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या! त्यानंतर काय झाले… वाचा सविस्तर

71991

कामोत्तेजना वाढवण्यासाठी काहीलोक विचित्र गोष्टी करतात. त्याचे त्यांना दुष्परिणामही भोगावे लागतात. व्हियाग्रा घेण्यासह अनेकजण विविध प्रकारची औषधे, जटीबुटी वापरतात. ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते. मेक्सिकोच्या एका युवकाने सेक्स पॉवर वाढवण्यासाठी चक्क बैलांना देण्यात येणाऱ्या सेक्स पॉवरच्या गोळ्या घेतल्या. ते त्याच्या जीवावर बेतले होते. त्यातून तो थोडक्यात बचावला आहे.

मेक्सिकोमध्ये बैलांना उत्तेजित करण्यासाठी आणि त्यांची सेक्स पॉवर वाढवण्यासाठी गोळ्या मिळतात. एका युवकाने सेक्स पॉवर वाढवण्यासाठी या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस उलटूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांना त्याच्या लिंगावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर आता त्याची प्रकृती सुधारत आहे. या युवकाला 30 वर्षांच्या महिलेसोबत संभोग करण्यासाठी सेक्स पॉवर वाढवण्याची गरज भासली. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या औषधांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मेक्सिकोमधील शेतकरी गाईंचे प्रजनन करण्यासाठी बैलांची सेक्स पॉवर वाढवण्यासाठी त्यांना विशेष गोळ्या देतात. त्यामुळे एक बैल अनेक गाईंना गर्भधारणा करण्यास सक्षम होतो, अशी माहिती त्याला मिळाली. त्यामुळे कोणताही मागचापुढचा विचार न करता युवकाने या गोळ्या मिळवल्या आणि त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. त्यामुळे तो अतिउत्तेजित झाला. त्याला तशाच अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याची कामोत्तेजना कमी करण्यासाठी डॉक्टरांनी तीन दिवस त्याच्यावर उपचार केले. मात्र, त्याची कामोत्तेजना कमी होत नव्हती. त्यामुळे त्याची अस्वस्थता वाढून त्याची प्रकृती ढासळत होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या लिंगावर श्सत्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर काही प्रमाणात त्याची कामोत्तेजना कमी झाली. आता त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या गोळ्या शेतकऱ्यांना बैलांची सेक्स पॉवर वाढवण्यासाठी देण्यात येतात. मात्र, वेराक्रूज या ठिकाणाहून या युवकाने या गोळ्या मिळवल्या. अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर असलेले वेराक्रूज सेक्स पॉवर वाढवण्याच्या औषधांच्या तस्करीसाठी ओळखले जाते.त्याचसोबत मानव तस्करी, वेश्याव्यवसाय यासाठीही हा भाग ओळखला जातो. त्यामुळे या भागातून त्याला या गोळ्या सहज मिळाल्या. त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्याच्या जीवावर बेतले होते. मात्र, त्यातून तो थोडक्यात बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या