एमएचटी-सीईटीचा आज निकाल

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी 2022 परीक्षेचा निकाल उद्या, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 नंतर जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

एमएचटी-सीईटीच्या पीसीएम ग्रूपची (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) परीक्षा 5 ते 11 ऑगस्टदरम्यान, तर पीसीबी ग्रूपची (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) परीक्षा 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. पीसीएम ग्रूपच्या परीक्षेला 2 लाख 81 हजार 146 विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी ग्रूपसाठी 3 लाख 23 हजार 869 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.