‘मी विजेता होणारच’ या पुस्तकाचे संजीव पेंढारकर यांच्या हस्ते प्रकाशन

5 जानेवारी 2021 रोजी विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मी विजेता होणारच’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर उमेश कणकवलीकर यांनी पेंढारकर यांच्या हस्ते करून घेतले. डॉक्टर उमेश कणकवलीकर हे एक धडाडीचे उद्योजक असून महाराष्ट्रात तरुण-तरुणींना स्फूर्ती देऊन उद्योजक बनवण्याचे ते काम करत असतात. ‘मी विजेता होणारच’ या पुस्तकाच्या माध्यमातून तरुणांमध्ये आत्मविश्वासाची भावना चेतवण्यात मोठी भूमिका त्यांनी बजावली आहे. हे पुस्तक म्हणजे युक्त्यांचा एक लहानसा संग्रह आहे असे शब्द संजीव पेंढारकर यांनी पुस्तक प्रकाशनावेळी काढले.

सरळ सोप्या भाषेत वास्तविकतेवर आधारित असे विशिष्ट पद्धतीचे हे पुस्तक आहे. कोणत्याही व्यक्तीने आयुष्यात कोणत्याही स्तरावर, कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही वयात यशस्वी कसे बनावे, यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी हे पुस्तक साकारले आहे. ध्येय, अडचणींवर मात, प्रयत्न, निरंतर सराव, चिकाटी, अफाट मेहनत आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन वगैरे सारखे गुण  हे लेखक कणकवलीकर यांनी पेंढारकर यांच्यामध्ये बघून त्यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसादिवशी शंभराव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याची मनीषा पूर्ण केली. विको लॅबोरेटरीजचे प्रचंड यश पाहून प्रकाशन झाल्यावर डॉक्टर उमेश कणकवलीकर यांनी संजीव पेंढारकर यांचे हृदयापासून आभार मानले आणि पुस्तक प्रकाशित केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या