या पॉर्नस्टारला मिळाले फक्त साडेआठ लाख रूपये, आता करतेय ‘ही’ नोकरी

2610

मिया खलिफा हे पॉर्न इंडस्ट्रीमधलं सर्वाधिक शोधलं जाणारं नाव आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्रीला फार पूर्वीच रामराम ठोकला असून ती आता एक नोकरी करते आहे. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर नोकरी मिळवणं हे माझ्यासाठी दिव्यच होतं असं मियाने म्हटलं आहे. 2014 साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेल्या मियाला बुरखा घालून व्हिडीओ चित्रीत केल्याबद्दल इसिसकडून धमक्या मिळाल्या होत्या. तेव्हापासून ती जगभरात चर्चिली जात होती आणि पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत सगळ्यात वर आली होती.

मियाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने म्हटलंय की मी गडगंज श्रीमंत असेन असं अनेकांना वाटतंय मात्र मला माझ्या कामाचे जवळपास साडेआठ लाख रुपयेच मिळाले असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. मात्र नेटीझन्सनी ती खोटं बोलत असल्याचा दावा केलाय. तिचे इतके व्हिडीओ डाऊनलोड होतात, ती इतकी प्रसिद्ध आहे तरी तिला इतकचे पैसे कसे काय मिळू शकतात असा प्रश्न या नेटीझन्सनी विचारला आहे.

मियाने पॉर्न इंडस्ट्रीबाबत बोलणं सातत्याने टाळलं होतं. मात्र आता तिने त्याबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. मियाच्या नावाने एक वेबसाईट चालवण्यात येत असून त्याची मालकीण ही तिच असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे खोटं असून ही वेबसाईट आपल्या मालकीची नाही असं तिने सांगितलं आहे. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर आपण नोकरीसाठी बरीच धडपड केली मात्र तिला अनेक ठिकाणी नकार पचवावा लागला. अखेर तिला एका क्रीडा वाहिनीवर वृत्तनिवेदकाची भूमिका मिळाली आहे. मियाचा प्रियकर हा एक शेफ असून लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या