देशाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूचा घटस्फोट, पत्नीला द्यावे लागणार 192 कोटी

2683

मैदानावरील क्रिकेटपटूंचा परफॉर्मन्स आणि मैदानाबाहेरील त्यांचे खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत असते. खेळाडूंचे अफेअर, प्रेम आणि घटस्फोट यामध्येही चाहत्यांनी रस असतो. अशाच एका दिग्गज क्रिकेटपटूने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांत दोघांचा संसार मोडला असून दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार मायकल क्लार्कने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियान प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले असून याला क्लार्कनेही दुजोरा दिला आहे. सात वर्षांपूर्वी क्लार्क आणि कायलीचा विवाह झाला होता. दोघांना एक मुलगी असून घटस्फोटाआधी गेले पाच महिने ते वेगळे राहात होते.

michael-clarke-family

घटस्फोटाबाबत बोलताना क्लार्क म्हणाला की, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यामुळे दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांच्या आनंदाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. दरम्यान घटस्फोटानंतर क्लार्कला पोटगी म्हणून पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत अशीही माहिती मिळत आहे.

दमदार कारकीर्द
मायकल क्लार्कने 245 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7981 धावा केल्या आहे, तर 115 कसोटीत 8643 धावांची नोंद त्याच्या नावार आहे. 2015 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये क्लार्कने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते आणि संघाचा चॅम्पियन बनवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या